राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत घेण्यास माझा नकार.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – युती आघाडी, या चर्चांना उधाण येतं जेव्हा निवडणूक येतात, २०१९ लोकसभा निवडणूक आता येऊ घातल्या आहेत. युती ही वेगवेगळ्या विचारांवर, ध्येय धोरणांवर होते. भाजप आणि सेनेच्या युतीचा कलह हा आपण नेहमीच पाहतो. पण यामध्ये महाआघाडीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत घेण्यास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट विरोध केला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखती दरम्यान चव्हाण यांनी आपले मत मांडले.

तर यावेळी चव्हाण बाळासाहेबांबद्दल बोलताना म्हणाले बाळासाहेबांची शैली वेगळी होती, बाळासाहेबांचं व्यक्तीमत्व वेगळे होते. मात्र, जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, असे म्हणत चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

नुकताच त्यांच्यावरील सिनेमा आला. पण, बाळासाहेबांना जे जमलं ते उद्धवला जमेल असं कशावरून. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. या वरून असच सिद्ध होत कि उद्धव ठाकरेंच नेतृत्व पक्षबळकटीच्या कामाचं नाही. चव्हाण यांनी एकप्रकारे टीकाच केली. तर, अॅक्सिटेंडल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात सर्व दाखवलेल्या घटना चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला नकारात्मक पद्धतीने लोकांसमोर दाखवायचा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमांकडे केवळ करमणुकीचे माध्यम म्हणून पाहाता येईल.

याचे अनुकरण होऊ शकत नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना केवळ करमणूक म्हणूनच पाहाता येईल, त्याचे अनुकरण होऊ शकत नाही. तसेच या चित्रपटाचा निवणुकांसाठी कुठलाही फायदा होणार नसल्याचे चव्हाण यांनी आपल्या बोलण्यातून सुचवले आहे.