काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका डॉक्टरला बिकीनी फोटो फेसुबकवर शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे. म्यानमारमधील नँग सान (Nang Mwe San) असं या डॉक्टरचं नाव आहे. बिकीनी फोटो सोशलवर पोस्ट केल्यामुळे तिचं डॉक्टरचं लायसंस रद्द करण्यात आलं आहे. या घटनेनंतर ति आपली बाजू मांडताना ही घटना म्हणजे तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे असे म्हटले आहे.

डॉक्टर असणाऱ्या नँगचा हा बिकीनीमधील लुक म्यानमार मेडिकल काऊंसिलला आपत्तीजनक वाटल्यामुळे त्यांनी ३ जून रोजी नँगच्या नावाने पत्रक काढत तिचं लायसंस रद्द केलं. काऊंसिलने काढलेल्या पत्रकात असे म्हटले होते की, नँगने घातलेले कपडे हे म्यानमार संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात आहेत. नँगने पाच वर्ष डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस केली आहे. तिला याआधीही जानेवारीमध्ये पत्रक पाठवण्यात आले होते ज्यात तिला तिचे फेसबुकवरील बिकीनी फोटो काढून टाकण्यास सांगितले होते. हे पत्रक मिळाल्यानंतर नँगने त्यावर स्वाक्षरी देखील केली होती. परंतु स्वाक्षरी करूनही तिने आपले फोटो सोशलवरून काढले नव्हते.

नँग सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. बिकीनीमधील तिच्या फोटोंमध्ये तिने अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल केंडल जेनरची नक्कल केली आहे. पाच वर्ष डॉक्टर म्हणून पाच प्रॅक्टीस करणाऱ्या नँगने 2017 मध्ये मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर सुरु केलं होतं. नँग 29 वर्षांची आहे.

या सगळ्याबद्दल बोलताना नँग म्हणते की, “मेडिकल इथिक्समध्ये ड्रेसकोडवर कोणतेही निर्बंध नाहीत. रुग्णांवर उपचार करताना मी अशा पद्धतीचे कपडे कधीच घालत नाहीत. त्यामुळे मेडिकल काऊंसिलने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही.” या निर्णयामुळे न्यायालयात धाव घेण्याच्या विचारात असणारी नँग म्हणते की, “त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये. वैयक्तिक आयुष्यात मी कशी आहे याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही.” अस नँगने स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

#YogaDay2019 : ‘या’ आसनाने स्वभावात होतात सकारात्मक बदल

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता