‘कोरोना’च्या रूग्णांसाठी ‘मायलेन’ने लॉन्च केले जेनेरिक ‘रेमडेसिविर’, बाजारात केले उपलब्ध

नवी दिल्ली : प्रमुख औषध कंपनी मायलेनने कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांसाठी ’डेसरेम’ नावाने रेमडेसिविरचे जेनेरिक औषध लाँच केले आहे. कंपनीने सोमवारी ही माहिती दिली.

यापूर्वी कंपनीने म्हटले होते की, त्यांचे रेमडेसिविर औषध भारतात जुलैपासून मिळण्यास सुरूवात होईल, ज्याच्या 100 मिलीग्राम बाटलीची किंमत 4,800 रुपये असेल.

मायलेनने एका वक्तव्यात म्हटले की, कोरोना व्हायरसचे संशयित किंवा गंभीर रूग्ण, हॉस्पिटलमध्ये असलेले ज्येष्ठ आणि मुलांच्या उपचारात या औषधाच्या वापराला परवानगी मिळाली आहे.

कंपनीने म्हटले की, डेसरेम बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. मागणीनुसार संपूर्ण देशभरात त्याची पूर्तता केली जाईल. कंपनीने भारतात याच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केला आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना संक्रमित
कोरोनाचे संक्रमण देशात वेगाने वाढत आहे. भारतात कोरोना संक्रमितांची संख्या 11 लाख 18 हजारच्या पुढे पोहचली आहे, तर मरणार्‍यांची संख्या 27 हजारच्या पुढे गेली आहे. भारत संपूर्ण जगात तिसरा सर्वात जास्त संक्रमित देश आहे. येथे संक्रमितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे. देशात महाराष्ट्र सर्वात जास्त संक्रमित राज्य आहे. येथे संक्रमितांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. यानंतर तमिळनाडु आणि देशाची राजधानी दिल्ली सर्वात जास्त संक्रमित आहे.

कोरोनाची वॅक्सीन बनवण्यासाठी अनेक देश करत आहेत काम
जेवढ्या वेगाने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, जगभरात तेवढ्याच वेगाने कोरोना वॅक्सीनवर काम सुरू आहे. सध्या जगात कोरोना वॅक्सीनवर 120 ठिकाणी काम सुरू आहे. यापैकी 13 वॅक्सीन ह्यूमन ट्रायल फेजमध्ये पोहचल्या आहेत. चीनच्या सर्वात जास्त वॅक्सीन ह्यूमन ट्रायलमध्ये आहेत. चीनमध्ये 5, ब्रिटनमध्ये 2, अमेरिकेत 3, रशियात, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये 1-1 कोरोना वॅक्सीन ह्यूमन ट्रायल फेजमध्ये आहेत.