धक्कादायक…. टक्कल पडण्याच्या भीतीने मुलीची आत्महत्या

म्हैसूर : वृत्तसंस्ठा

हेअर स्ट्रेटनिंग केल्यांनतर केस गळू लागल्याने नैराश्य आलेल्या म्हैसूरमधील एका विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केली. नेहा गंगमा असं या मुलीच नाव आहे. नेहा बीबीएची विद्यार्थिनी होती. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेली नेहा म्हैसूर येथे पेइंग गेस्ट म्हणून राहात होती.

काही दिवसांपूर्वी म्हैसूरमधील एका स्थानिक पार्लरमधून नेहाने हेअर ट्रीटमेंट करून घेतली होती. हेअर स्ट्रेटनिंग केल्यांनतर तिचे केस मोठ्या प्रमाणावर गळू लागले होते. त्यामुळे ती चिंतेत होती.

जाहिरात

नेहाची आई श्याला यांनी पोलिसांना सांगितलं की, “नेहाने त्यांना फोनवर सांगितलं होते तिचे खूप केस गळत आहेत. केस इतके विरळ होऊ लागले होते की जवळपास टक्कल पडण्याच्या मार्गावर आहे. लाजेमुळे तिची कॉलेजमध्येही जाण्याची इच्छा नव्हती. ट्रीटमेंटमुळे तिच्या त्वचेला एलर्जी आली होती. मित्रमंडळींना काय उत्तर द्यावं या विवंचनेत ती असायची. यामुळेच तिला कॉलेजला जाण्याची इच्छा नव्हती. ”

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, ती म्हैसूर मधून २८ ऑगस्टला बेपत्ता झाली होती. १ सप्टेंबरला तिचा मृतदेह लक्ष्मण तीर्थ नदीजवळ सापडला.
[amazon_link asins=’B078RJN314,B07DC5QRHN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d08339b-af65-11e8-8691-0d464c044e86′]