समुद्र किनार्‍यावर एक विचित्र जीव पाहून लोक ‘हैराण’, कुणालाही माहित नाही याचे नाव

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये समुद्र किनार्‍यावर एक अज्ञात समुद्री जीव सापडला आहे, ज्यास पाहून तज्ज्ञ सुद्धा हैराण झाले आहेत. या जीवासंबंधी कुणाला काही माहिती नाही. राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकार्‍यांनी या रहस्यमय जीवाचे छायाचित्र आपल्या फेसबुक पेजवर शेयर करून याबाबत लोकांकडून माहिती मागितली आहे. त्यांनी छायाचित्र पाहून म्हटले की यास ओळखण्यात आम्ही अयशस्वी ठरलो आहोत यासाठी लोकांची मदत मागितली जात आहे.

मात्र, अधिकार्‍यांना संशय आहे की, एखाद्या अंड्यातून हा जीव बाहेर आला असू शकतो. या विचित्र जीवात अनेक बोटे आणि अवयव आहेत. हा समुद्र जीव छोट्या सफेद चेंडूंनी भरलेला दिसत आहे.

या रहस्यमय समुद्र जीवाबाबत फेसबुकवर विचारण्यात आले आहे की, आपल्याला माहिती आहे का हे काय आहे ? काही महिन्यांपूर्वी हा समुद्र किनार्‍यावर आढळला होता. याबाबत कुणाकडे काहीही माहिती नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेयर होताच लोकांनी या जीवाबाबत अंदाज वर्तवण्यास सुरू केले.

एका व्यक्तीने याबाबत माहिती देताना म्हटले की, स्क्विड एग मास आहे. हे पुन्हा समुद्रात टाकले पाहिजे जेणेकरून अंडी वाढू शकतील आणि जीव बाहेर येतील. सामान्यपणे, ते मादी स्क्विडद्वारे बाहेर काढले जाते.

एका अन्य एक फेसबुक यूजर्स मायकल वेक्चिओनने कमेंट बॉक्समध्ये एक लेख शेयर करत सांगितले की, हे एक स्क्विड एग मास आहे जे समुद्र जीव लोलिगिनिडेच्या प्रजातीशी संबंधीत आहे. कॅलिफ मार्केट स्क्विडच्या कुटुंबत तीन प्रजाती सामान्य आहेत. हे लॉलीगुनकुला ब्रेव्हिस प्रमाणे दिसत आहे