6 हॉटेलच्या मालकाची गळफास घेऊन ‘रहस्यमय’ आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबईतील ६ हॉटेलचा मालक असलेल्याने अंधेरी येथील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैभव शेट्टी (वय ३७, रा़ स्वाप्ना नगरी, विलीज टॉवर, मुलुंड) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार अंधेरीतील हॉटेल ग्रेसमधील ६ व्या मजल्यावरील खोलीमध्ये घडला.

वैभव शेट्टी हे विवाहित असून त्यांना ३ महिन्यांचा मुलगा आहे. वैभव शेट्टी यांची मुलुंडमधील हॉटेल वैभव सह मुंबईत सहा हॉटेल आहेत. शुक्रवारी ते हॉटेलमध्ये आले व खोलीत स्वत:ला बंद केले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बऱ्याच वेळ खोलीचा दरवाजा वाजविला. तरीही आतून प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी डी एन नगर पोलीस ठाण्याला कळविले.

त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा बेडरुममधील सिलिंग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. वैभव शेट्टी यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. हॉटेलच्या खोलीत चिठ्ठीही सापडून आलेले नाही.

Visit : Policenama.com