’एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ सचिन वाझे यांचे स्वत:चे जग आहे रहस्यमय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात संशयीत संबंधांवरून चर्चेत असलेले मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांनी अनेक प्रकारे जीवन जगले आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्टपासून आपले सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म चालवणे आणि व्हॉट्सअपसारखे स्वदेशी मॅसेजिंग अ‍ॅप डिझाईन करणार्‍या या माजी एन्काऊंटर स्पेशलिस्टने पोलिसिंगशिवाय अनेक क्षेत्रात हात अजमावला आहे.

हेच सर्वकाही नाही, या निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाने (एपीआय) दोन पुस्तके सुद्धा लिहिली आहेत, त्यांच्या नावावर सहा ट्रेडमार्क नोंदणीकृत होते आणि एकदा कॉपीराईटचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात त्यांनी बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझावर खटला दाखल केला होता.

सचिन वाझे मागील जूनमध्ये पुन्हा खात्यात कार्यरत होण्यापूर्वी 2003 मध्ये ख्वाजा युनुसच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात कथित भूमिकेमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. 2020 मध्ये मुंबई पोलीस दलात परतण्यापूर्वी, वाझे यांनी तंत्रज्ञान, एन्क्रिप्टेड साहित्य, सोशल मीडिया, सायबर स्पेस आणि दूरसंचारच्या जगतात प्रवेश केला.

वाझे यांचे स्वत:चे मॅसेजिंग अ‍ॅप

ख्वाजा यूनुस प्रकरणात सचिन वाझे यांच्या कथित भूमिकेनंतर ते निलंबित होण्यापूर्वी, वाझे यांनी तंत्रज्ञान संबंधीत गुन्हे जसे की, सायबर-क्राईम, बँक कार्ड आणि फसवणूक इत्यादीवर काम केले.

निलंबित झाल्यानंतर, त्यांनी अनेक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणि उत्पादने बनवण्यासह आपल्या सायबर कौशल्याचा आणि अनुभवाचा उपयोग केला.

यापैकी सर्वात त्यांचे प्रभावी मॅसेजिंग आणि कम्युनिकेशन अ‍ॅप ‘डायरेक्ट बात‘ होते. उद्योजक, सरकारी एजन्सीज आणि हाय-प्रोफाईल लोकांसाठी विशेषप्रकारे डिझाईन करण्यात आले होते, वाझेंनी या पेड सर्व्हिसबाबत ’पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित संपर्क सूट’ असल्याचा दावा केला.

हा प्लॅटफॉर्म ऑक्टोबर 2018 मध्ये लाँच करण्यात आला होता. एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म, संदेश पाठवणे, व्हिडिओ कॉलिंग आणि फाईल शेयर करण्यास सक्षम, जे तंत्रज्ञान तज्ज्ञ संयोग शेलार यांच्यासोबत मिळून डिझाईन करण्यात आले होते.

डेव्हलपर्सकडून गुगल प्लेस्टोअरला दिलेली लिंक आता उपलब्ध नाही आणि ही सूचना देण्यात आलेली आहे की, हे अ‍ॅप हटवण्यात आलेले आहे.

वाझे यांचे सर्च इंजिन

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी याशिवाय भारत-केंद्रित लोकांची माहिती शोधण्यासाठी सर्च इंजिन सुद्धा बनवले, आणि यूजर्सला मोफत आणि पेड सर्व्हिस प्रदान केली. 2012 मध्ये हे लाँच करण्यात आले. सचिन वाझे यांचे Indianpeopledirectory.com नावाचे सर्च इंजिन नाव, पत्ता, संपर्क आणि पार्श्वभूमी शोधातून संबंधीत माहिती देण्याचा दावा करते.

’मराठी फेसबुक’चे वाझे व्हर्जन

सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने 2006 मध्ये आपले दरवाजे यूजर्ससाठी उघडले होते आणि निलंबित मुंबई पोलीस अधिकार्‍याला ते फॉलो कारण्याची घाई होती. त्यांनी 2010 मध्ये मराठी भाषिकांसाठी एक स्थानिक सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्मचे आपले व्हर्जन लाँच केले.

सध्या अयोग्य ठरवण्यात आलेल्या या सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्मने त्यावेळी ‘मराठी फेसबुक‘च्या रूपात प्रचार केला होता. याच्या प्रमोशनल व्हिडिओत मराठी लोकांना आपल्या स्वताच्या सोशल नेटवर्कमध्ये येणे आणि मित्र तसेच सहकार्‍यांशी सलग्न होण्याचे आवाहन केले होते.

मार्क झुकरबर्गच्या फेसबुकप्रमाणे, सचिन वाझे यांच्या प्लॅटफॉर्मने आपल्या युजर्सला अमर्याद संख्येत फोटो, पोस्ट लिंक आणि व्हिडिओची शेयर करण्याची ऑफर दिली.

सचिन वाझे यांनी कायदा, सुरक्षा, कम्प्यूटर हार्डवेयर आणि सोशल नेटवर्किंगशी संबंधीत सेवांसाठी आपल्या नावांच्या विरूद्ध सहा ट्रेडमार्क दावे दाखल केले होते. वाझे यांच्याकडून दावा दाखल करण्यात आलेल्या काही ट्रेडमार्क्स मध्ये LAPCOP, KNOW YOUR LAW, A Fascinating Side of Life आणि LAI BHAARI चा समावेश होता.

आपल्या ट्रेडमार्कचा लाभ घेत सचिन वाझे यांनी एकदा कॉपीराईट उल्लंघनाबाबत अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझावर केस दाखल केली, कारण त्यांनी 2014 मध्ये त्यांच्या ट्रेडमार्कशी मिळता-जुळता एक मराठी चित्रपट लाँच केला होता.

2012 मध्ये त्यांचे मराठी पुस्तक ‘जिंकून हरलेली लढाई‘मध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.

सचिन वाझे यांनी आपले दुसरे पुस्तक ’द स्काऊट’ अन्य एका माजी पोलीस अधिकारी शिरीष थोरात यांच्यासोबत मिळून लिहिले होते. 2019 मध्ये आलेल्या या इंग्रजी पुस्तकात दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.