धक्कादायक ! दत्तक मुलीनं प्रियकरासोबत संगनमत केलं, वडिलांचे हात-पाय अन् गुप्तांग कापलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडले होते. या घटनेनं प्रचंड खळबळ उडाली होती. या अवयवांचा शोध लागला असून हे गूढ आता उलगडले आहे. संपत्तीसाठी दत्तक घेतलेल्या मुलीनेच अल्पवयीन प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना अटक केली आहे. सुटकेसमध्ये सापडलेले अवयव सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या 62 वर्षीय बॅनोटो यांचे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. संपत्तीच्या वादातूनच बॅनोटो यांची हत्या झाली आहे. गुन्हे शाखेनं या प्रकरणी दत्तक मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

नेमकं काय झालं ?
बॅनोटो हे पंचतारांकित हॉटेलात म्युझिक शो करत असत. सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला मस्जिद येथे ते एकटे रहात होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका तरुणीला दत्तक घेतलं होतं.

सदर मुलीचं एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. दत्तक मुलीला बॅनोटो यांची संपत्ती हवी होती. लालसेपोटी तिनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं बॅनोटो यांची राहत्या घरीच हत्या केली. यावरच ते थांबेल नाहीत. त्यांनी बॅनोटो यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांचे अवयव सुटकेसमध्ये भरले. याच्या तीन सुटकेस केल्या. या सुटकेस त्यांनी वाकोला येथून वाहत जाणाऱ्या मिठी नदीत फेकून दिल्या.

यातीलच एक सुटकेस माहीम पोलिसांना सोमवारी माहीम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या समुद्रकिनारी सापडली होती. यात खांद्यापासून कापलेला डावा हात आणि गुडघ्यापासून खाली कापलेला उजवा पाय तसेच प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत गुप्तांग होते. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like