अँटिलीया प्रकरणातील मोठा खुलासा ! ज्या इनोव्हामधून पळाला होता संशयित आरोपी ती मुंबई पोलिसांची निघाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतील अँटिलीया प्रकरणात इनोव्हा कार प्रकरण देखील सोडविण्याचा दावा केला जात आहे. असे सांगितले जात आहे की, अँटिलीया प्रकरणात दोन वाहने होती, यात एक स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा. हि दोन्ही वाहने बंगल्या बाहेर आल्या होत्या. ड्रायव्हर स्कॉर्पिओला सोडून इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेला.

मुंबईच्या मुलुंड टोल ब्लॉकवर इनोव्हासह येथे दोघे जण दिसले होते. इनोव्हा कार मुंबई क्राइम ब्रँचची असल्याचे सांगितले जात आहे. स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरन होता. मात्र, इनोव्हा कार कोणाची होती? याबाबत चौकशी आता सुरू आहे. चौकशीत ही कार मुंबई पोलिसांची अथांत गुन्हे शाखेची असल्याचे उघड झाले आहे. इनोव्हा कार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (सीआययू) युनिटची आहे. मुंबई पोलिसांचा आणखी एक अधिकारी रियाज काझी याच्याकडेही सध्या अँटिल्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सचिन वाझे यांची विशेष शाखेत बदली होण्यापूर्वी त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती केली होती. सुरुवातीला गुन्हे शाखा हिच या प्रकरणाचा तपास करत होती. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन कारचा वापर करण्यात आला होता. स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या होत्या. तर, दुसरी कार इनोव्हा होती, जी स्कॉपिओ कारच्या मागे मागे येत होती. इनोव्हा कार मुंबईच्या मुलुंड टोल ब्लॉक येथे दिसली होती. इनोव्हा आणि स्कॉर्पिओ कार मुंबईच्या चेंबूर भागात एकत्र आढळल्या होत्या. त्यानंतर दोन्ही कार अँटीलियाच्या दिशेने निघाल्या.

एनआयएच्या सूत्रांनी असे सांगितले की, दोन्ही वाहने अँटिलीयाच्या बाहेर पोहोचली होती. यातील स्कॉर्पिओ बाहेर पार्क केली गेली आणि त्याचा ड्रायव्हर इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेला. स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर, इनोव्हा कार मुलुंड टोल ओलांडून ठाण्यात प्रवेश करताना दिसली. ठाण्यात प्रवेशानंतर इनोव्हा कार सापडली नाही. या प्रकरणातील विशेष म्हणजे, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे दोघेही ठाण्यातील रहिवासी आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीत एनआयएला धक्कादायक बाब आढळली आहे ती म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी सचिन वाझे यांच्याकडून स्कॉर्पिओ कार चोरी झाली होती. सध्या तपास अधिकारी सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहेत. त्यांच्या घराबाहेर बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली जात आहे. या प्रकणात देखील स्कॉर्पिओ कारची चोरी झाल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. त्यामुळे चोरी झालेली कार या प्रकरणात वापरण्यात आली. तसेच त्यानंतर त्या कार मालकाचा मृतदेह कसा काय आढळतो? यावर अनेक बाजूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अंबानी यांचा बंगला अँटिलीयाच्या बाहेर आढळलेल्या जिलेटिन कांड्यावरून राज्य सरकारच्या पोलिसांकडील तपास आता एआयएकडे गेला आहे. हा तपास एआयएकडे दिला जावा, अशी मागणी देखील यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. एनआयए केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. आणि केंद्रात भाजप अर्थात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या प्रकरणावरून भाजप आता महाराष्ट्रातील या महाविकास आघाडीला चांगलंच धारेवर धरेल, असे समजत आहे.