‘त्या’ १ कोटीच्या नोटांचे गुढ…

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – लाचेसाठी मोठ्या रक्कमेची मागणी करणाऱ्याला ती रक्कम देण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नोटांच्या बंडलावर काही खऱ्या नोटा ठेवतात व त्याच्याखाली नोटाच्या आकाराचे कोरे कागद ठेवण्यात येतात. बुलढाणा -मलकापूर मार्गावरील मोहेगाव फाट्याजवळ एकाकडील बॅगेत तब्बल १ कोटी रुपयांच्या नोटा आढळून आल्या. पण, त्यात वरच्या बाजूला काही खऱ्या नोटा तर त्याखाली मुलांच्या खेळण्यातील नोटा आढळल्याने अशा नोटा घेऊन ते कोणाला देण्यास चालले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

८० हजाराची लाच घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

बुलढाणा – मलकापूर मार्गावरील मोहेगाव फाट्याजवळ एका संशयास्पद स्थितीत बॅग घेऊन उभा असलेल्याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत तब्बल १ कोटी १० लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. मंगळवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार समोर आला. बोराखेडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील नोटा मोजण्यास सुरुवात केली तर त्याच्याकडील बंडलमध्ये वर खरी नोट व त्याखाली बनावट खेळण्यातल्या नोटा असल्याने ते सर्व कशासाठी अशा प्रकारे नोटा घेऊन चालले होते, याचे गुढ आहे.

बोराखेडी पोलिस ठाण्यांतर्गत बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोहेगाव फाट्यानजीक एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत बॅग घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन किसन गजानन तायडे (२२, रा. तारतलाव कॉम्प्लेक्स, बुलडाणा) या संशयिताला बॅगसह ताब्यात घेतले. पंचांसमक्ष या बॅगची झडती घेतली असता त्यात २ हजार, पाचशे व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. पाचशे रुपयांच्या बंडलांमध्ये वरील बाजूला एक खरी नोट व खाली मुलांच्या खेळण्यातील नोटा होत्या तर, दोन हजार रुपयांच्या चार हजार ५४४ नोटा, पाचशे रुपयांच्या ३ हजार ८०८ नोटा व दोनशे रुपयांच्या ८२ मुलांच्या खेळण्यातील नोटा यात आढळून आल्या आहेत.

नोटा घेऊन ते कोठे चालले होते, हे त्याच्या साथीदारांना पकडल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.