सचिन वाझेबरोबर असणाऱ्या महिलेचा NIA कडून शोध सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  स्फोटक कारप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता तेथील सीसीसीटीव्ही फुटेज एनआयएने हस्तगत केली आहे. सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले असून ज्यावेळी सचिन वाझे हॉटेलमध्ये आले तेव्हा एका महिलादेखील त्यांच्या मागून हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचं या फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे हि महिला कोण आहे याचा शोध एनआयएने सुरु केला आहे. त्याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिल आहे.

एनआयएच्या तपासात मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी सचिन वाझे हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्यास आले होते. ते सुशांत सदाशिव खामकर या नावाने थांबले होते. महत्त्वाचे म्हणजे खामकर याच नावाने त्याने बनावट आधारकार्ड बनवून त्यावर वाझे यांनी स्वतः चा फोटो लावला होता. याशिवाय हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एक अज्ञात महिला त्यांच्यासोबत असल्याचं समोर आल आहे. या महिलेसंबंधी एनआयएने वाझेंकडे चौकशी केली मात्र ते तपासात सहकार्य करत नाही. ते या महिलेबद्दल काहीही सांगण्यास तयार नाहीत. दरम्यान क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये सचिन वाझे असताना तपास करत असलेल्या एखाद्या दुसऱ्या प्रकरणात या महिलेची चौकशी केली जात होती. असे सूत्रांचे मत आहे. या महिलेची लवकरच ओळख पटवली जाईल त्यानंतर तिच्याकडेही चौकशी करण्यात येणार आहे.

एनआयएकडून हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. याशिवाय हॉटेलमध्ये ज्यावेळी सचिन वाझे यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे पाच बॅग होत्या. हे सीसीटीव्हीत दिसत आहे. परंतु या बॅग एनआयएच्या हाती लागल्या नाहीत त्याचाही शोध सुरु झाला आहे.