Myths And Facts During Pregnancy | गरोदरपणातील खाणे-पिणे आणि त्यासंबंधीत काही गैरसमज आणि त्यांचे सत्य जाणून घ्या!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Myths And Facts During Pregnancy | काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत महिलांना गरोदरपणात अनेक प्रकारचे सल्ले ऐकायला मिळतात. गरोदरपणातील (Pregnancy ) आहाराशी संबंधित अनेक गैरसमज तुम्ही ऐकले असतील. या काळात अनेक खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या काळात संतुलित आहारासोबतच शरीराला सर्व पोषकतत्वे मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीत योग्य पौष्टिक अन्नपदार्थाकडे कोणत्याही गैरसमजामुळे किंवा संशयामुळे दुर्लक्ष करणे योग्य नाही. (Myths And Facts During Pregnancy)

 

गर्भधारणा आणि त्यादरम्यान आहाराविषयी गैरसमज आणि सत्य :

– गैरसमज 1 :
पपई आणि अननस (Papaya, Pineapple) यांसारखी फळे, जेली आणि हिरवी केळी यासारख्या थंड गोष्टी खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो असा एक समज आहे.

 

– सत्य :
डॉ. विनिता साहनी, स्त्रीरोग तज्ञ, माय लाइफ केअर, हेल्थ सर्व्हिस अ‍ॅप (सल्लागार) यांनी म्हटले आहे की, लोकांमध्ये असा गैरसमज आहे की पपई आणि अननस यांसारख्या फळांसह थंड गोष्टी खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो, परंतु आत्तापर्यंत असे कोणत्याही संशोधनात आढळून आलेले नाही.

 

चांगली पिकलेली पपई सुरक्षित असते आणि व्हिटॅमिन-ए, बी आणि पोटॅशियमचा (Vitamin-A, Vitamin B, Potassium) उत्कृष्ट स्रोत असते, जे बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, कच्ची किंवा अर्धवट-पिकलेली पपई टाळली पाहिजे कारण त्यात पॅपिन असते, ज्यामुळे ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लँडिन सारख्या हार्मोन्सचा स्राव वाढू शकतो.

 

या हार्मोन्समुळे गर्भाशय आकुंचन होऊ शकते आणि बाळाचा अकाली जन्म होऊ शकतो. प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी (Protein, Fiber, Carbohydrates, Healthy) वसा – तुम्हाला आणि तुमच्या बाळाला निरोगी ठेवते. (Myths And Facts During Pregnancy)

 

अननस सारख्या काही खाद्यपदार्थांबद्दल तुम्हाला अजूनही चिंता वाटत असल्यास, त्यांना इतर प्रकारांनी बदला जेणेकरून पुरेशी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतील.

– गैरसमज 2 :
असे म्हटले जाते की, गरोदर असताना दोन जणांसाठी खावे. त्यामुळे जास्त खा आणि आवडेल ते खा.

 

– सत्य :
असे केल्याने तुमचे अनावश्यक वजन वाढेल जे नंतर कमी करणे कठीण होईल. यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याऐवजी, आहाराच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. चरबी, मीठ आणि साखर कमी करा. (Fat, Salt, Sugar) धान्य, फळे, भाज्या, शेंगा आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवा.

 

– गैरसमज 3 :
हलक्या रंगाचे अन्न खाल्ल्याने बाळ गोरे होईल.

 

– सत्य :
त्वचेचा रंग अनुवांशिक आहे आणि कोणतेही अन्न तो बदलू शकत नाही. उलट यासाठी काही खाद्यपदार्थ टाळल्याने गर्भधारणेसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.

 

– गैरसमज 4 :
औषधे आणि टॉनिक घेतल्याने मूल अधिक हुशार होईल. गर्भवती महिलांसाठी बाजारात अनेक हर्बल टी (Herbal Tea) आणि टॉनिक उपलब्ध आहेत.

 

– सत्य :
यास दुजोरा देणारे कोणतेही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे नाहीत.

– गैरसमज 5 :
बरेच लोक फुल क्रीम दूध जास्त पौष्टिक असल्याचे सांगून ते पिण्याचा सल्ला देतात.

 

– सत्य :
कमी चरबीयुक्त आणि स्किम दुधाच्या उत्पादनांमध्ये फुल-क्रीम दुधाइतकेच पोषक घटक असतात. त्यामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण कमी असते जे गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी निरोगी आणि कमी-कॅलरीचा पर्याय ठरते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Myths And Facts During Pregnancy | myths and facts about foods to eat and avoid during pregnancy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Daibetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार