अर्ध्या रात्री माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या बंगल्यावर चालवला JCB ; TDP कार्यकर्त्यांची बंगल्याबाहेर गर्दी

अमरावती : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील ‘प्रजा वेदिका’ बंगला तोडण्यासाठी बंगल्यावर जेसीबी चालवण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांनी ‘प्रजा वेदिका’ बंगला तोडण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या विरोधात नायडू समर्थक बंगल्याबाहेर जमले आहेत.

पोलिसांच्या उपस्थितीत बंगला तोडण्याचे काम सुरु झाले आहे. कुटुंबासोबत सुट्टीवर गेलेले चंद्राबाबू नायडू परतले आहेत आता ते सरळ प्रजा वेदिका बंगल्यावर पोहचले आहेत.

आंध्रप्रदेशमधील सत्ता गेल्यानंतर चंद्राबाबू यांना मिळणाऱ्या सवलती कमी होत आहेत. तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाची सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे. मुलगा नारा लोकेशला असलेली झेड सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

नायडूंची मागणी फेटाळली

मंगळवारीच बंगला तोडण्याचे काम सुरु झाले आहे. गेल्या दिवसात चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून ‘प्रजा वेदिका’ बंगल्याला विरोधी पक्षाच्या नेत्याचे सरकारी निवास म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांची मागणी रेड्डी यांनी फेटाळून लावली.

‘प्रजा वेदिका’ बंगल्याची निर्मिती तेलगू देसम पक्षाच्या सरकारकडून एन चंद्रबाबू नायडू यांच्या अधिकृत घराच्या जवळ केली होती. याचा उपयोग सरकार आणि पक्ष चालविण्यासाठी केला जात होता.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे