जलवाहिनी फुटली आणि पै पै गोळा करून मुलीच्या लग्नासाठीचे दागिने, पैसे वाहून गेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जनता वसाहतीतील कालवा फुटीच्या घटनेला काही महिने उलटल्यानंतर परिसरातील घराखालून जाणारी जलवाहिनी फुटल्याने पै पै जमा करून मुलीच्या मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले सोन्याचे दागिने, पैसे, इतर साहित्य पाण्यात वाहून गेले. डोळ्यांदेखत सर्वकाही वाहून जाताना पाहून रहिवाशांच्या मध्यरात्री अचानक जलवाहिनी फुटल्याने जनता वसाहतीतील ८ घरांचे नुकसान झाले आहे.

दांडेकर पुलाशेजारील जनता वसाहत परिसरात मागील काही महिन्यांपुर्वी कालवा फुटून अनेकांचे संसार वाहून गेले होते. घरांचेही नुकसान झाले होते. परंतु काल मध्यरात्री उशीरा अचानक आणखी एक घटना घडली. घरांखालून वाहणारी जलवाहिनी अचानक फुटली आणि जनता वसाहतीतील संगीता भरत काशिद यांच्या घराखालून जाणारी जलवाहिनी फुटली. पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने त्यांनी घराबाहेर पडण्यासाठी धावाधाव केली. पंरतु शक्य झाले नाही.

काही वेळाने बाहेरून लोकांनी दरवाजा तोडून त्याना बाहेर काढले. मात्र या सर्व गोंधळात त्यांच्या घरात त्यांनी एक एक पैसा जमवून मोठा केलेला संसार डोळ्यांसमोर वाहून गेला. संगिता काशीद मागील २५ वर्षांपासून राहण्यास आहेत. संगीता काशिद या भाजी विक्री करतात. तर त्यांचे पती हमाली करतात. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते. मुलीचा विवाह दोन महिन्यांवर आल्याने त्यांनी घरात दागिने, साहित्य आणि पैसे जमवून ठेवले होते. मात्र ते पाम्यात वाहून गेले त्यामुळे आता काय करावे हाच प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. ही घटना सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

दरम्यान या परिसरातील आठ घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर तीन नागरिक जखमी झाले असून तीन घरांना तडे गेले आहेत.