मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागिन 4 ही मालिका टीव्ही वरील अनेक प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. निया शर्मा, विजयेंद्र कुमेरिया आणि जास्मीन भसीन या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. लवकरच जास्मीन शो सोडणार आहे. ही बातमी ऐकून जास्मीनच्या चाहत्यांना झटका लागण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/B8SKZWNFR7F/?utm_source=ig_embed
एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, जास्मीननंही शो सोडण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. जास्मीन सांगते की, तिचा रोल फक्त प्रेक्षकांना हा विचार करायला लावण्याचा होता की तीच नागिन आहे. अशा प्रकारे शोमध्ये ट्विस्ट येतो आणि निया शर्मा नागिन बनून सर्वांनाच सरप्राईज देते. हा नागिन 4 चा एक ट्विस्ट आहे. मालिकेत नयनताराचा रोल करणाऱ्या जास्मीन भसीननं मालिकेचा शेवटचा एपिसोडही शुट केला आहे.
आपल्या कॅरेक्टरबद्दल बोलताना जास्मीन म्हणते, “नयनतारासोबत जे काही होईल त्यावरून हळूहळू पडदा उठेल.” आपल्या रोलपासून खुश नसल्याच्या प्रश्नावर जास्मीन म्हणते, “मला माझ्या रोलपासून काहीच अडचण नाही. मला माहिती होतं की हा रोल संपणार आहे. नागिन 4 च्या एका लेटेस्ट प्रोमोमध्ये नागिन 3 ची विशाखा म्हणजेच अनिता हसनंदानी नयनताराला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B76S1v3lWDW/