Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) गोवा येथील सांगता समारंभात इस्रायलमधील पटकथा लेखक व दिग्दर्शक नदाव लॅपिड परीक्षक होते. त्यांनी भारतीय ‘दी काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर ताशेरे ओढले. काश्मीर फाइल्स हा अश्लील आणि प्रचारकी चित्रपट आहे, असे नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी आपल्या निरीक्षणात नोंदविले होते. त्यावरून देशात आणि राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली. भाजपेतर पक्षांनी लॅपिड यांच्या निरीक्षणाचे स्वागत केले, तर भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील याप्रकरणी ट्विट करत आपले मत मांडले होते. त्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नदाव लॅपिड (Nadav Lapid) आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. (The Kashmir Files Controversy)

काश्मीर फाइल्सवर अश्लीलतेचा आरोप करणारे इफ्फीचे मुख्य ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे विकृत मानसिकतेचे म्हणून त्यांच्या देशात, इस्रायलमध्ये ओळखले जातात. थोडक्यात काय तर ते इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड आहेत, असे अतुल भातखळकर म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी ट्विटद्वारे लॅपिड यांचे समर्थन केले होते. आव्हाड लिहितात,
“तो इस्रायली असल्याने मुस्लिमविरोधी ‘काश्मीर फाइल्स’ चालवून घेईल, अशी सरकारची अपेक्षा होती.
पण ‘प्रचारकी आणि गलिच्छ’ चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लॅपिडने सणसणीत चपराक लगावली.”

त्यामुळे वाद निर्माण झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती.
हा चित्रपट देशातील एका पक्षाचे समर्थन करणारा होता आणि अन्य पक्षांची निंदा करणारा होता.
या चित्रपटात पूर्णपणे भाजपचा प्रचार करण्यात आला होता.
या चित्रपटानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले होते व याच्या निर्मितीतून मोठ्या प्रमाणात पैसा जमा
करण्यात आला. पण, त्यातील एक छदामदेखील काश्मिरी पंडितांच्या पीडित किंवा निर्वासित कुटुंबांना देण्यात
आला नव्हता, असेही राऊत म्हणाले होते.

Web Title :- Nadav Lapid | bjp atul bhatkhalkar cmpares ncp jitendra awhad with israel-filmmaker nadav lapid over the kashmir files controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; पिकअप वाहन उलटले, 7 जण जखमी