Nadav Lapid | ज्या देशामध्ये सत्य किंवा मनातील बोलण्याची क्षमता कमी झाली आहे, तेथे कोणीतरी बोलणे आवश्यक आहे – नदाव लॅपिड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या गोव्यातील सांगता समारंभात इस्रायलचे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे मुख्य ज्युरी होते. यावेळी त्यांनी भारतीय ‘दी काश्मिरी फाइल्स’ चित्रपटावर टीका केली होती. हा चित्रपट पूर्णपणे अश्लील असून प्रचारकी आहे, असे नदाव लॅपिड (Nadav Lapid) म्हणाले होते. त्यामुळे देशात वादाला तोंड फुटले होते. भाजप आणि चित्रपट निर्माते यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यावरून लॅपिड यांनी त्यांच्या केलेल्या निरीक्षणावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

लॅपिड यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकांना प्रत्युत्तर दिले. आपल्याला या चित्रपटावर बोलणे महत्वाचे वाटले म्हणून आपण बोललो, असे लॅपिड म्हणाले. तसेच काश्मीरमधील भारतीय धोरणांचे समर्थन करणारा चित्रपट पाहून मला धक्का बसला. या चित्रपटात फॅसिस्ट फीचर्स आहेत. हा चित्रपट 90 च्या दशकातील काश्मिरी हिंदूंच्या पलायनावर आधारित आहे. येत्या काही वर्षांत असा चित्रपट इस्रायलमध्ये बनला तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझ्यासाठी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलणे आणि राजकीय विधाने करणे सोपे काम नव्हते. तरीदेखील मी प्रतिक्रिया दिली. इथला प्रत्येकजण सरकारचे कौतुक करत आहे. मी या ठिकाणी पाहुणा आहे. मला त्यांनी चांगली वागणूक दिली. तरीदेखील मला त्यांच्या विरोधात बोलायचे होते. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर सरकारवर ताशेरे ओढावे लागले, हे सोपे काम नव्हते. माझ्या मनात भीती होती व अस्वस्थता होती, तरीही मी बोललो, असे लॅपिड म्हणाले.

तसेच मी बोलताना किंवा बोलून झाल्यावर माझ्या वक्तव्याच्या परिणामांची चिंता केली नाही.
मी काल ज्या समारंभात बोलत होतो, तेथे हजारो लोक बसले होते. तेथे सर्व लोक आनंदी होते.
त्यांच्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्षात पाहून सर्वजण खूश होते. सर्व लोक सरकारचा जयजयकार करत होते.
ज्या देशामध्ये सत्य बोलण्याची किंवा मनातील बोलण्याची क्षमता कमी झाली आहे, तेथे कोणीतरी बोलले पाहिजे.
ते आवश्यक होते. म्हणून मी स्पष्टपणे मनाला जे योग्य वाटले किंवा वाटले नाही, ते बोललो.
जेव्हा मी हा चित्रपट पाहिला, तेव्हा मी हा चित्रपट इस्रायलमध्ये बनविण्याची कल्पना करू शकलो नाही, असे लॅपिड यांनी नमूद केले.

 

Web Title :- Nadav Lapid | nadav lapid firtst reaction after he called the kashmir files vulgar at iffi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

Sanjay Raut | ‘उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू’

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर