श्रवण यांची पत्नी-मुलगा सुद्धा आहे आजारी, हॉस्पिटलमध्ये दाखल; नदीम यांनी व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संगीत जगतातील महत्वाचा भाग असलेले संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांनी काल जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपला जोडीदार नदीम अख्तर सैफीसोबत मिळून बॉलीवुडला अनेक गाणी दिली. मात्र, आता श्रवण यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात दु:खाची लाट आली आहे. अभिनेते आणि अनेक सेलिब्रेटी श्रवण यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशावेळी अनेक वर्ष त्यांचे पार्टनर असलेले नदीम यांनीसुद्धा श्रवण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

श्रवण राठोड काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांचा मुलगा आणि पत्नी सुद्धा संक्रमित झाले होते. प्रकृती जास्त बिघडल्याने श्रवण यांना एसएल रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर त्यांचे संपूर्ण कुटुंब दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा श्रवण यांनी आपला अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे कुटुंब त्यांच्या जवळ नव्हते.

नदीम यांनी श्रवण यांच्या मृत्यूविषयी दु:ख व्यक्त करताना म्हटले की, माझा शानू आता राहीला नाही. आम्ही दोघांनी सोबत एक जीवन पाहिले आहे. आम्ही सोबत उंचीवर पोहचलो आणि काहीवेळा सोबत घसरलो सुद्धा आहोत. आम्ही सोबत अनेकप्रकारे मोठे झालो. आम्ही कधीही बोलणे बंद केले नाही आणि कोणतेही अंतर आम्हाला दूर करू शकत नव्हते. मला हे बोलताना अतिशय दु:ख होत आहे की, माझा मित्र, माझा सहकारी, माझा पार्टनर, जो अनेक वर्षापासून माझ्या सोबत होता, आता तो नाही. मी त्याच्या मुलासोबत बोललो, जो खुप दु:खात आहे.

नदीम सैफी यांनी पुढे म्हटले, जेव्हापासून श्रवणने सांगितले की त्याची प्रकृती बिघडली आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे, आम्ही तेव्हापासून रोज बोलत होतो. श्रवण यांची पत्नी आणि मुलगा सुद्धा आजारी आहेत आणि हॉस्पिटलमध्ये आहेत. मी स्वताला खुप अपराधीपणा जाणवतोय कारण मी त्यांच्या सोबत तिथे राहू शकत नव्हतो. जेणेकरून मी त्यांची मदत करू शकलो असतो किंवा मित्राला निरोप देऊ शकलो असतो.