सोनाली आणि इरफान नंतर ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीला झाला कॅन्सर

मुंबई  : वृत्तसंस्था – सोनाली बेंद्रे आणि इरफान खान यांना कॅन्सर झाल्या नंतर आता नफीसा अली या बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रीला कँसर झाला आहे. नफीसा यांचा हा  कॅन्सर थर्ड स्टेजला पोहचला आहे .याबाबत त्यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या आहे. नफीसाअली यांनी काही दिवसापूर्वी सोनिया गांधींसोबतचा फोटो शेअर करत या गोष्टीचा खुलासा केला होता. ‘माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीला भेटले. तिने मला कॅन्सरशी लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या. असे त्यांनी लिहिले होते.

याआधी  त्यांनी एक व्हिडीओ  शेअर केला होता या व्हिडिओ मध्ये त्यांची नातवंड त्यांची केस कपात आहे. या व्हिडिओ मध्ये त्यांनी असे लिहिले होते की  मी किमोथेरपीसाठी जातेय, याची त्यांना कल्पनाही नाही.आम्ही खूप मस्ती केली त्याआधीच्या पोस्ट मध्ये त्या भावूक झाल्या होत्या माझे खूप सारे केस गळू लागले आहेत. ते पाहून मला रडू आले. उगाच नाही, वास्तव हे आहे की, मला कॅन्सर आहे. किमोथेरपी काम करतेय, असे त्यांनी लिहिले.

नफीसा अली यांनी १९७६ चा मिस इंडिया चा ‘किताब आपल्या नावी  केला होता यांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. मेजर साहब (१९९८), क्षत्रिय (१९९३),   बेवफा (२००५),लाइफ इन अ मेट्रो (२००७),यमला पगला दीवाना(२०१०), गुजारिश (२०१०) यांसारख्या चित्रपटात अबिनाय केला आहे .  नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.