नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या

श्रावण शुक्ल पंचमी तिथीला नागांच्या पूजेचा सण म्हणजेच नागपंचमी साजरी केली जाते. या तिथीला भगवान शंकराचे अभूषण असलेल्या नागाची पूजा करतात. जर कुंडलीत राहु केतुची स्थिती ठिक नसेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने लाभ होतो. यावेळी नागपंचमीचा सण शनिवार, 25 जुलैरोजी साजरा केला जात आहे. जाणून घेवूयात यादिवशी कोणती कामे करणे टाळले पाहिजे.

करू नका ही कामे

1. या दिवशी जमीन खोदणे किंवा शेत नांगरणे खुप अशुभ मानले जाते. म्हणून ही कामे करू नयेत.

2. नागपंचमीच्या दिवशी टोकदार आणि धारदार वस्तूंचा वापर अशुभ मानला जातो. प्रामुख्याने सूई-दोर्‍याचा वापर करू नये. असे करणे अशुभ मानले जाते.

3. चुलीवर जेवण बनवताना लोखंडी तवा किंवा कडईचा वापर करून नये, असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो, असे मानले जाते.

4. नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीसाठी वाईट बोलू नका.

5. ज्या लोकांच्या कुंडलीत राहु-केतुचा दोष आहे, ज्यांनी या दिवशी विशेष प्रकारे नागदेवतेची पूजा केली पाहिजे. असे केल्याने कुंडलीत येत असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात.