Nag Panchami 2020 Mantra : ‘नाग पंचमी’च्या दिवशी करा ‘या’ मंत्रांचा जाप, दूर होवु शकतात सर्व दु:ख

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी नाग पंचमी म्हणून साजरी केली जाते. या पवित्र सणाला महिला नाग देवताची पूजा करतात. आणि सापाला दूध अर्पण करतात. यावर्षी नाग पंचमी 25 जुलै अर्थात शनिवारी साजरी केली जाईल. या दिवशी महिला आपला भाऊ आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. नाग पंचमी ही भारतभर हिंदूंनी केलेली नाग देवतांची पारंपारिक पूजा आहे.

असे मानले जाते की, सापांना अर्पित करण्यात येणारे कोणतेही पूजन नाग देवतांच्या समक्ष पोहोचते. सापांना हिंदु धर्मात पूजनीय मानले गेले आहे. आज आम्ही आपल्याला नाग पंचमीच्या दिवशी जपल्या जाणाऱ्या काही मंत्रांबद्दल सांगणार आहोत. नाग पंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जाप केल्याने आपले सर्व दुःख नाहीसे होतात. या मंत्रांबद्दल जाणून घेऊया.

नाग पंचमी पूजा मंत्र –

सर्वे नागाः प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले.
ये च हेलिमरीचिस्था येऽन्तरे दिवि संस्थिताः॥
ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिनः.
ये च वापीतडगेषु तेषु सर्वेषु वै नमः॥

मंत्राचा अर्थ – या जगात आकाश, स्वर्ग, तलाव, विहिरी आणि सूर्य किरणांमध्ये वास्तव्य करणारे साप, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्ही सर्व तुम्हाला पुनःपुन्हा नमन करतो.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्.
शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्.
सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः.
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥

मंत्राचा अर्थ – अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशी नऊ सर्प देवतांची नावे आहेत. जर सकाळी त्यांचा नियमितपणे जप केला गेला तर सर्प देवता तुमचे सर्व पापांपासून रक्षण करतील आणि तुम्हाला जीवनात विजयी करतील.