Nagpanchami 2020 : नागपंचमीला बनतोय दुर्मिळ ‘योग’, ‘या’ 6 उपायांनी मिळेल कालसर्प दोषमुक्ती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  नागपंचमीचा सण श्रावण शुक्ल पंचमी तिथीला साजरा केला जातो. शास्त्रात नागांना पाताळचे मालक मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा दागिना असलेल्या नागांची पूजा केली जाते. नागांची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, सिद्धी आणि धनप्राप्ती करता येऊ शकते. यावेळी नागपंचमी 25 जुलैला साजरी केली जाईल. या दिवशी एक दुर्मिळ योग बनत आहे, जो कालसर्प दोष निवारण करण्यासाठी खुप उपयुक्त आहे.

कुंडलीत कालसर्प दोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कालसर्प दोष पीडित व्यक्तीच्या जीवनात विवाहात अडचण, दाम्पत्य जीवनात भांडण, शिक्षणात अडथळे, रोग, दुखापतीने त्रस्त राहणे, आर्थिक चणचण, नोकरी सूटणे, संततीला त्रास आदी समस्या येतात.

यावेळी नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष निवारणाचा दुर्मिळ योग बनत आहे, ज्यामुळे या दोषातून सहज मुक्ती देऊ शकतो. हा योग उत्तरा फाल्गुन आणि हस्त नक्षत्राच्या प्रथम चरणात बनत आहे. याशिवाय या दिवशी परिगणित आणि शिवयोग सुद्धा बनत आहे. हे सर्व योग यावेळी नागपंचमी खुप शुभ बनवत आहेत.

हे उपाय करा

1 ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी उपवास केला पाहिजे आणि नागदेवतेची पूजा केली पाहिजे.

2 नागपंचमीच्या दिवशी नागांच्या पूजेसह भगवान शंकर आणि माता पार्वतीची सुद्धा करा. मातीची नाग-नागिन बनवून त्यांची दूध, धान्य, लाह्या, दूर्वा, अक्षता, पान इत्यादीने पूजा करा. यामुळे नागदेवतेसह महादेवाची सुद्धा कृपा प्राप्त होते.

3 नागपंचमीच्या दिवशी नारळावर नाग आणि नागिनीची चांदीची जोडी बनवून गंड्याने बांधून नदीच्या वाहत्या पाण्यात सोडा.

4 काळ्या अखीकच्या माळेने राहु ग्रहाचा बीज मंत्रजप 108 वेळा करा, यामुळे सुद्धा फायदा होईल. या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता.

5 दूधात खडीसाखर आणि भांग टाकून शिवलिंगवार अपर्ण करा. हे केल्याने या दोषाने प्रभावित जातकाचा राग शांत होतो.

6 ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी दररोज भगवान शंकराला चंदन किंवा चंदनाचे अत्तर अर्पण करावे आणि नंतर ते स्वत: लावावे.