Nagaland Firing News | नागालँडमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात 11 लोकांचा मृत्यू; परिसरात तणावपूर्ण वातावरण

0
71
Nagaland Firing News | nagaland 11 killed in nagaland in a case of mistaken identity amit shah assured thorough probe
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नागालँड राज्यातील मोना जिल्ह्यात असणाऱ्या ओटिंग गावात शनिवारी गाडीमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू (Nagaland Firing News) झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी या घटनेला दुजोरा देत घडलेली घटना निंदनीय असून लोकांनी शांतता राखावी. या प्रकरणाचा सखोल तपास SIT करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. (Nagaland Firing News)

 

 

या घटनेसंदर्भात ट्विटरद्वारे बोलताना मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी सांगितले की, मोन ओटिंगच्या नागरिकांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरच चांगली होईल तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती आहे. या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय एसआयटी करेल तसेच कायद्यानुसार न्याय दिला जाईल. मात्र, लोकांनी शांत रहावे असे आवाहन त्यांनी केले. (Nagaland Firing News)

 

 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी देखील या घटनेवर ट्विटरद्वारे दु:ख व्यक्त केलं.
ते म्हणाले, नागालँडमध्ये घडलेली घटना दु:खद आहे. या घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. या घटनेचा तपास राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Nagaland Firing News | nagaland 11 killed in nagaland in a case of mistaken identity amit shah assured thorough probe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | जादुटोणाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रारीची धमकी; पुजार्‍याला लुबाडणार्‍या दोघांना अटक; महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले; पुण्यातील पाषाण परिसरातील घटना

Pune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा धाक दाखवून चालकाला लुबाडले