अहमदनगर : एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – नगर तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीवरील एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा झाली आहे. काल सायंकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. तब्बल 14 जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.

आरोग्य केंद्रामधून रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर ती दोन तासांनी आरोग्य केंद्रात पोहोचली, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली. यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी उशीर झाला. 13 रुग्णांची प्रकृती व्यवस्थित आहे. एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

विषबाधा झालेल्यांमध्ये ललिता अतुल वाघ (३०), राहुल समेश माळी (२५), सुनीता राहुल माळी (२२), मोनाली रमेश माळी (१५), जनाबाई शंकर माळी (७०), सूरज रोहिदास पवार (२० ), पूजा भास्कर वाघ (१५ , ऊजा भास्कर वाघ (१४), कार्तिक सूरज पवार (५), सुदर्शन अरुण वाघ (३) आदींचा समावेश आहे.

जुनी आणि नवीन बाजरी एकत्रित दळून त्या पिठाच्या भाकरी खाल्ल्याने विषबाधा झाली, असे काही लोक सांगतात. तर मासे खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like