8000 ची लाच घेताना सिव्हिल हॉस्पीटलमधील महिला लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला 8 हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.

शिल्पा राजेंद्र रेलकर (वय 41 वर्षे, कनिष्ठ लिपिक, वर्ग 3,जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर. रा. शासकीय निवासस्थान, घर नं. 4 , पत्रकार चौक, अहमदनगर) हे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार महिला ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. त्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांना शासकीय सेवेत नियमित करून घेण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवुन नियमित केलेबाबतचे आदेश त्वरित देणेकरिता शिल्पा रेलकर यांनी तक्रारदारांकडे 8 हजार रु. लाचेची मागणी केली. सदरची रक्कम आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयात स्विकारली.

पोलीस उपधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शिल्पा रेलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like