तोतया मेजरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मेजर असल्याची बतावणी करून एअरगन घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस लष्करी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. माळीवाडा बस स्थानक परिसरात ही घटना घडली.

एक व्यक्ती मेजर असल्याची बतावणी करून फिरत होता. हा प्रकार लष्करी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. लष्करी अधिकाऱ्यांनी माळीवाडा बसस्थानक परिसरात त्याला पकडले. त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आढळला. अधिकाऱ्याने पकडून त्याची चांगली धुलाई केली. त्यानंतर कोतवाली पोलिसांना कळवले. पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मेजर असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र अथवा कुठलेही कागदपत्र आढळून आले नाही. त्याच्याकडे असलेले शस्त्र एअरगन होते. पोलिसांनी ती हस्तगत केली. याप्रकरणी तोतया व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.