नगरचे सैराट हत्याप्रकरण : पित्याला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरमध्ये सैराट चित्रपटाप्रमाणे केलेल्या ‘ऑनर किलिंग’मधील मयत मुलीच्या वडिलांना पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे. रामा रामफल भरतिया हे अटक केलेल्या वडिलांचे नाव आहे.

याप्रकरणी पारनेर पोलिसांनी यापूर्वी मयत मुलीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना अटक केली आहे. रामा भरतिया हे फरार होते. आज पित्यालाही अटक करण्यात आली आहे.

निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते. त्यावेळी रुक्मिणी हिने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिला व तिचा पती मंगेश या दोघांना घरात कोंडून पेटवून देण्यात आले होते. या ‘ऑनर किलिंग’च्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.