माजी खा. दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर प्रशासकाची नियुक्‍ती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी खासदार दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) आज प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. आरबीआयच्या एका पथकानं आज बँकेला अचानक भेट दिली होती. त्यानंतर तडकाफडकी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. बँकेच्या काही कर्ज प्रकरणात अनियमीतता असल्याचे सांगण्यात येत आहे तर बँकेचा एनपीए वाढला होता. त्यामुळे आरबीआयच्या पथकाने आज बँकेला व्हिजीट दिली. त्यानंतर सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. दिलीप गांधी हे भाजपाचे माजी खासदार आहेत. अचानकपणे आरबीआयच्या पथकाने बँकेला भेट दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –