राजकीय वादातून सरपंचाचा गोळ्या घालून खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील निंबेदैत्य नांदूर येथे गावातील राजकीय वादातून दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंचासह चार जण जखमी झाले होते. यातील जखमी सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आज रात्री ही घटना घडली.

गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 50) हे मयत झाले आहेत. ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) हे जखमी आहेत. याबाबत माहिती अशी की, भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होत आहे.

या घटनेतील मयत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी तीन ते चार वेळा वाद झाले आहेत. आज संजय दहिफळे यांच्यावर गोळीबार झाला. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/