उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या मुलीचा मृत्यू, ऊसतोडणी मजूर कुटुंबियांवर शोककळा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उपचाराअभावी सर्पदंश झालेल्या ऊसतोडणी मजुराच्या मुलीचा मृत्यू झाला. सर्पदंश झालेल्या मुलीवर सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्यामुळे तिला मृत्यूला सामोरे जावे लागले. या दुर्दैवी घटनेमुळे ऊसतोडणी मजूर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झालेल्या मुलीला तिच्या कुटुंबियांनी उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणले होते. परंतु, येथील अधिकाऱ्यांनी मुलीस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने मुलीच्या कुटुंबीयांनी रात्री नगर शहरातील अनेक खासगी दवाखान्याना विनंती केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

खाजगी दवाखाने यांनी उपचारासाठी दाखल करून न घेतल्यामुळे पुन्हा सिव्हिलमध्ये आणले. यावेळी मात्र मुलीस दाखल करून उपचार देण्याची तयारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी दाखवली. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रुग्णालयात त्या मुलीला मृत घोषित करण्यात आले. हे ऊसतोडणी मजूर सध्या राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे वास्तव्यास आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/