गोळीबार प्रकरणातील चौघांना 24 तासांच्या आत अटक, ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राहाता तालुक्यातील लोणी येथे गोळीबार करून श्रीरामपूर येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत चार आरोपींना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून अटक केली आहे.

अटक केलेल्यांमध्ये सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय-२४ वर्षे, रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर), संतोष सुरेश कांबळे (वय-२८ वर्षे, रा. मुन्नाभाई वखारीचे बाजूला, बीफ मार्केट जवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर), गाठण उर्फ शाहरुख उस्मान शहा (वय-२० वर्षे, रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर), अरुण भास्कर चौधरी (वय-२३ वर्षे, रा. सोनगाव रोड, खंडोबा मंदीर जवळ, लोणी प्रवरा, ता. राहाता) यांचा समावेश आहे.

फरदीन आब्बू कुरेशी (वय- १८) यास नाशिक येथे सोबत येण्यासाठी आरोपी सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख, संतोष सुरेश कांबळे, शाहरुख उस्मान शहा (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी जबरदस्ती करुन व धमकी देवून त्यास प्रथम नाशिक येथे नेवून व त्यानंतर लोणी येथे आणून त्यांचे साथीदार उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी, ता- राहाता) अशांनी मिळून काहीतरी वादाचे कारणावरुन गावठी कट्टयातून गोळीबार केला. यात फरदीन आब्बू कुरेशी याची हत्या केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, आण्णा पवार, शंकर चौधरी, रविन्द्र कर्डीले, विजय वेठेकर, संदीप घोडके, संतोष लोढे, संदीप दरंदले, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपूते, सागर ससाणे, रविंद्र घंगासे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, सचिन आडबल, विजय टोंबरे, मयुर गायकवाड, चालक पोहेकॉ/बबन बेरड आदींच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून चौघांना अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like