शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, महिला ग्रामस्थांनी दिला चोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अल्पवयीन मुलींची अश्लील वर्तन केले. हा प्रकार पालकांना समजताच काही महिला ग्रामस्थांनी शिक्षकांची चांगलीच धुलाई केली. अकोले तालुक्‍यातील वाघापूर येथे आज ही घटना घडली.

वाघापूरमधील गंभीरवाडीतील जिल्हा प्राथमिक शाळेतील शिक्षक शाळेतील मुलींशी अश्लिल वर्तन करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार मुलींच्या पालकांना समजला. त्यानंतर ग्रामस्थ आज एकत्र येऊन शाळेत जमा झाले.

शाळेत जमा झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला विचारणा केली. त्यावेळी संतप्त झालेल्या काही महिलांनी संबंधित शिक्षकाची चप्पलने धुलाई केली. या शिक्षकाने अनेकदा मुलींशी गैरवर्तन केले आहे. याबाबत अनेकदा ग्रामस्थांना संबंधित शिक्षकाला समज दिली होती. त्यानंतर या शिक्षकामध्ये सुधारणा झाली नव्हती. संबंधित शिक्षकाला अकोले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/