खंडणी मागून बांधकाम मजुराचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणी मागून बांधकाम मजुराचा कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात आला आहे, तर एकाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील रांझणी येथे ही घटना घडली.

साहील उर्फ सोन्या मुबारक पठाण (वय -19 वर्ष, रा खोसपुरी, ता. जि. अहमदनगर) हे मयताचे नाव आहे. इरफान हसन पठाण (वय- 20, रा. खोसपुरी ता- जि अहमदनगर) हे जखमी झालेले आहेत. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात बुट्या पवार, साहेबराव तुकाराम पवार (दोघे रा. रांझणी, ता. पाथर्डी) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. इरफान पठाण हे व त्याचा चुलत भाऊ व चुलता हे सदर बांधकाम करीत होते. गावातील टोळक्याने येऊन आमच्या गावात बांधकाम करायचे असेल, तर हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून साहील उर्फ सोन्या मुबारक पठाण (वय -19) यांच्या डोक्यात कु-हाड घालून त्यास जीवे ठार मारले. तसेच इरफान पठाण यांना कु-हाड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Visit : policenama.com