‘त्या’ 18 नगरसेवकांवरील कारवाईबाबात ४ किंवा ५ जानेवारीला निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आणि देशात भाजप विरोधी गट एकत्र येत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी जागा वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. असे असताना नुकत्याच झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १८ नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे भापजपचा महापौर याठिकाणी विराजमान झाला. मी स्वत: नगरच्या स्थानिक आमदरांना भजपला पाठिंबा न देण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, माझाच आदेश पाळला जात नसले तर ही बाब गंभीर आहे. भाजपला मदत करणाऱ्या नगरसेवकांकडून लेखी खुलासे मागवण्यात आले आहेत. त्यांचे लेखी खुलासे आल्यानंतर त्यांच्यावर ४ किंवा ५ तारखेला निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच नगरसेवकांसह स्थानिक आमदार यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्याता वर्तवली जात आहे.
अहमदनगर महापालिकेत नाट्यमयरित्या भाजपचे महापौर आणि उपमहापौर बनले. महापालिकेत शिवसेना जास्त जागा जिंकून देखील शिवसेनेला महापौर पद मिळवता आले नाही. भजपला राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपचा महापौर बनला. पक्षाने आदेश देऊन ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देऊन पक्षाची प्रतिमा धुळीला मिळवली आहे.
अहमदनगरमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊन त्यांचा महापौर आणि उपमहापौर निवडून आणला. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना थेट भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला गेल्याने राज्याच्या राजकारणात एक खळबळ निर्माण झाली. त्याची झळ थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांना बसू लागली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने पाठिंबा न मागताच व सर्व निकाल जाहीर होण्यापूर्वीच शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता, याची लोकांना आठवण झाली.
आता लोकसभा निवडणुकाचे वारे वाहू लागल्याने पवार यांनी मोदी विरोधात जोरदार भाषणे सुरु केली आहेत. अशात अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने पक्षाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होऊ लागला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवरही परिणाम झाल्याचे लक्षात आल्यावर आता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची चलबिचल सुरु झाली. या नगरसेवक, स्थानिक आमदर यांच्यावर येत्या ४ किंवा ५ जानेवारीला निर्णय घेण्यात येणार आहे. आता शरद पवार निर्णय घेणार हे आता ५ जानेवारीलाच समजेल.
भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक
प्रभाग १  : सागर बोरुडे, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर
प्रभाग २  : विनित पाउलबुद्धे, सुनील त्रंबके
प्रभाग ३  : समद खान,
प्रभाग ४  : ज्योती गाडे, शोभा बोरकर
प्रभाग ७  : कुमार वाकळे
प्रभाग ११  :  रूपाली जोसेफ पारघे, अविनाश घुले, परवीन कुरेशी, शेख नजिर अहमद
प्रभाग १४  :  प्रकाश भागानगरे, शितल जगताप, गणेश भोसले, मीना चोपडा