पोशिंदा बरबाद करणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नका : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या आयत्या तंत्रज्ञानावर आजचे सत्ताधारी स्वतःची टिमकी वाजवतात, त्या निष्क्रिय मोदी सरकारमधील लोक विचारतात, ७० वर्षांत काय झाले ? मात्र या लोकांनी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बरबाद केला असल्याने त्या निष्क्रिय मोदी सरकारला पुन्हा देशाच्या सत्तेवर येऊ देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

आगामी काळात दमदार देशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना संधी दिल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी युक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुलक्षणा सलगर, युवानेते रोहित पवार, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, दादा कळमकर, राजेंद्र फाळके, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले आदींची उपस्थिती होती.

Loading...
You might also like