अपघातानंतर डंपरने घेतला पेट, होरपळून एकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-औरंगाबाद रस्त्यावरील प्रवरासंगम येथे खासगी बस व डंपरचा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या डिझेलची टाकी फुटून डंपरने पेट घेतला. यात डंपरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. आज हा अपघात झाला.

पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय 27, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) हे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर कमानीजवळ नगरकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या खासगी बस (क्रमांक जी.जे.-14, झेड-8585) डंपरला (विना नंबर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरची डिझेल टाकी फुटून डंपरने पेट घेतला.

डंपरमध्ये असलेला मजूर पांडुरंग रामकिसन गायकवाड (वय 27, रा. प्रवरासंगम, ता.नेवासा) हा या अपघातात डंपरमध्येच होरपळून मरण पावला. तर डंपरचालक अशोक शिंदे, ट्रॅव्हल्स चालक मोहन थावरा राठोड (रा.वडहुळी, ता.जिंतूर, जि.परभणी), संतोष धोंगडे व इतर सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर खासगी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like