Nagar Panchayat Election | राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन– राज्यातील विविध 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा (Nagar Panchayat Election) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) जाहीर केला आहे. राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Nagar Panchayat Election) येत्या 21 डिसेंबरला मतदान (Voting) होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी (Counting of votes) होणार आहे. त्यासाठी नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान (Commissioner UPS Madan) यांनी आज केली.
राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Nagar Panchayat Election) मतदान होणार आहे. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. 4 आणि 5 डिसेंबरला सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे (Nomination) स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 होणार आहे. मतदान 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. तर 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. (Nagar Panchayat Election)
जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागले
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र (Caste Certificate) व जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करुन या निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
नगरपंचायतींचे जिल्हानिहाय नावे
ठाणे मुरबाड व शहापूर, पालघर – तलासरी, विक्रमगड, मोखाडा,
रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
रत्नागिरी- मंडणगड, दापोली
सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,
पुणे- देहू (नवनिर्मित)
सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी
सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,
सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)
नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा
धुळे- साक्री
नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ
अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी
जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव
जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)
परभणी- पालम
बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,
लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.
नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर
हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ
अमरावती- भातकुली, तिवसा
बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा
यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी
वाशीम- मानोरा
नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर
भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर
गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली
चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा
गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड
पोटनिवडणुकांसाठी मतदान
विविध जिल्ह्यातील 7 नगरपरिषदा/नगपंचायतींच्या रिक्त जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. शिरोळ (6अ), नागभीड (4अ), जत (5ब), सिल्लोड (12अ), फुलंब्री (2,8), वानाडोंगरी (6अ) आणि ढाकणी (12 आणि13) या नगरपरिषद/नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहेत.
Web Title : Nagar Panchayat Election | election of 105 nagar panchayats in maharashtra declared Maharashtra Election Commission
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aadhaar मध्ये नाव-पत्ता-फोन नंबर कसा करावा अपडेट, जाणून घ्या सर्व काही एकाच ठिकाणी
Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे नवीन दर