हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – हातकणंगले तालुक्याला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी स्थानिक नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नगरपंचायत गठीत करण्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर मात्र हातकणंगलेकरांनी आंनदोत्सव साजरा केला.

नगरपरिषदेचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी तहसीलदारांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव सतीश मोघे यांनी दिले आहेत. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव बराच काळ रखडलेला होता. त्यानंतर यासाठी कृती समिती स्थापन करून लढा सुरु करण्यात आला होता. या समितीच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील देण्यात आले होते. नगरपंचायत करण्याचे आश्‍वासन आ. हाळवणकर यांनी दिले होते.

दरम्यान नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मंगळवारी देण्यात आला. नगरपंचायत दर्जा मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, भगवान पवार, पंडित निंबाळकर, सागर पुजारी, मधुकर परीट, अतुल मंडपे व दादा गोरे यांच्यासह नागरिकांनी प्रयत्न केले.