टायरचे गोडावून फोडून दोन ट्रक भरून नेल्या, 15 जणांच्या टोळीतील तिघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयडीसी परिसरात एमआरएफ टायर गोडावून फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिघांना अटक केली असून, 12 जण फरार आहेत. दोन ट्रकमधून ही चोरी केली. पोलिसांनी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विभीषण राजाराम काळे (वय-५१ वर्षे, रा. आंदोरा, ता-कळंब, जि-उस्मानाबाद), बालाजी छगन काळे, (वय-३८ वर्षे, रा. मस्सा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), सुनिल नाना काळे (वय-२८ वर्षे, रा. मस्सा, ता-कळंब, जि- उस्मानाबाद) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार तात्या रमेश काळे (रा. मस्सा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), पिल्या रविन्द्र काळे (रा. मस्सा, ता-कळंब, जि- उस्मानाबाद), सुभाष भास्कर काळे (रा. आंदोरा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), रमेश लघमन काळे (रा. आंदोरा, ता. कळंब, जि-
उस्मानाबाद), सुनिल कालिदास शिंदे (रा. ढोकी, ता- उस्मानाबाद), दादा उर्फ राजेन्द्र छगन काळे (रा. मस्सा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), बंड्या उर्फ शहाजी बाबूराव काळे (रा. मस्सा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), शाम बिभीषण काळे (रा. आंदोरा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), बाबूशा भिमराज काळे (रा. मोहा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद), बबन बापू शिंदे (रा. मोहा, ता-कळंब, जि- उस्मानाबाद), सुधाकर श्रावण भगत (रा. हिंगोली, कन्हेरगांव जवळ), भागवत उर्फ भाग्या बाप्पा काळे (रा. मस्सा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद) हे फरार आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि. ०६/१२/२०१९ रोजीचे रात्रीचे वेळी नागापूर, एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फोडून गोडावून मधील १७,९८,२८६/-रु. किं.चे एमआरएफ कंपनीचे ट्रकचे व मोटार सायकलचे टायर चोरी करुन नेले होते. परंतु, टायर घेवून न जाता आल्याने चोरट्यांनी गोडावून काढलेले टायर गोडावून जवळच असलेल्या नदीपात्रातील झुडूपामध्ये टाकून देवून ९६,०००/-रु. किं. चे सहा टायर चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत गोडावूनचे सुपरवायझर श्री. शिवचरणदास दिनाबंधूदास, रा. मनोरमा कॉलनी, नवनागापूर, अ.नगर यांनी एमआयडीसी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. १६७९/२०१९, भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. त्यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा बिभीषण काळे, रा. मस्सा, ता- कळंब, जि- उस्मानाबाद याने व त्याचे साथीदारांनी मिळून कळंब येथून ट्रकमधून अहमदनगर येथे येवून केला असल्याची माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/गणेश इंगळे. सफी/सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, पोना आण्णा पवार, रविन्द्र कर्डीले, भागीनाथ पंचमख, विशाल दळवी. विश्वास बेरड, राहुल सोळंके, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक/बाळासाहेब भोपळे अशांनी मिळन कळंब, जि- उस्मानाबाद येथे जावून आरोपींची माहीती घेवून तिघांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांना सदरचा गन्हा हा त्यांचे साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/