सोनाराच्या सांगण्यावरूनच ‘सराफा’वर टाकला ‘दरोडा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – एका सोनाराच्या सांगण्यावरून दुसऱ्या सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केलीय. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील आपल्या सराफा दुकानातून घरी जात असताना निखिल बाळासाहेब अंबिलवादे या सोनाराच्या मुलास अन्यात चोरट्यांनी भरदिवसा रस्त्यात गाडी आडवी लावून डोळ्यात मिरची पूड टाकून आठ लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तपासाची सुत्रे हातात घेत पाचच दिवसांत आरोपींची छडा लावला. निखील नणनवरे, सोहेल शेख, जुबेर शेख, मतीन पठाण या आरोपींना बेड्या ठोकल्य. तर फरार असलेला सोनार आरोपी विजय ऊर्फ बच्चु देडगावकर राहणार कोल्हार तालुका राहता याने आपल्याच ओळखीचा असणाऱ्या खेडले-परमानंद येथील सोनाराची टिप देऊन ही लुटमार केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा –

You might also like