3 सराईत गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तीन कुख्यात गुंडांवर ‘एमपीडीए’ कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे. त्यांना एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. प्रवीण उर्फ दीपक बबन लाटे (वय ३०, रा. चिंचोली, ता. राहुरी), रविराज जगन्नाथ भारती (वय २९, रा. कुंभारी, ता. कोपरगाव) व अरुण बाबासाहेब घुगे (वय २२, राकेडगाव, नगर) ही कारवाई केलेल्यांची नावे आहे.

वाळूतस्करी, अवैध व्यवसाय व हाणामारीच्या घटनेत या तिघांविरोधात गुन्हे दाखल आहेत. प्रवीण लाटे याच्या विरोधात राहुरी, भारती याच्या विरोधात कोपरगाव, तर घुगे याच्या विरोधात कोतवाली व नगर तालुक्यात गुन्हे दाखल आहेत. या तिघांवर एमपीडीएअंतर्गत कारवाईचा स्थानिक पोलिसांनी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

कारवाईला मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, दीपाली काळे, सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अनिल कटके, काशिनाथ देशमुख, शंकरसिंग राजपूत, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉंस्टेबल संदीप घोडके, मोहन गाजरे, मनोज गोसावी, बाळासाहेब मुळिक, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, राहुल सोळंके, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, किरण जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Visit : Policenama.com