अहमदनगर : 5 गुंडाविरुद्ध एकाचवेळी ‘MPDA’, गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

नगर : पोलीसनामा ऑनलाइन  – जिल्ह्यातील पाच सराईत गुंडांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. एकावेळी तब्बल पाच जणांविरुद्ध एमपीडीए कारवाई केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कारवाई केलेल्या गुंडांमध्ये प्रशांत उर्फ पांड्या साईनाथ लेकूरवाळे (वय- २३ वर्षे, रा. निमगाव खैरी, ता- श्रीरामपूर), गणेश उर्प सोमनाथ बापूसाहेबर हाळनोर (वय- २५ वर्षे, रा. फत्याबाद, ता- श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (वय-२३ वर्षे, रा. डेरेवाडी, धांदरफळ बा, ता-संगमनेर), संतोष राघू शिंदे (वय- ४० वर्षे, रा. राजापूर, ता- श्रीगोंदा), राजू उर्फ राजेन्द्र भाऊ गागरे (वय- ४० वर्षे, रा. मांडवे खुर्द, ता- पारनेर) यांचा समावेश आहे.

तत्कालिन पोलीस अधिक्षक ईशू सिंधू, प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाळू तस्कर, अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. पारनेर, बेलवंडी, संगमनेर तालुका, श्रीरामपूर तालूका, लोणी या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी प्रशांत उर्फ पांड्या साईनाथ लेकूरवाळे (वय- २३ वर्षे, रा. निमगाव खैरी, ता- श्रीरामपूर), गणेश उर्प सोमनाथ बापूसाहेबर हाळनोर (वय- २५ वर्षे, रा. फत्याबाद, ता- श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (वय-२३ वर्षे, रा. डेरेवाडी, धांदरफळ बा, ता-संगमनेर), संतोष राघू शिंदे (वय- ४० वर्षे, रा. राजापूर, ता- श्रीगोंदा), राजू उर्फ राजेन्द्र भाऊ गागरे (वय- ४० वर्षे, रा. मांडवे खुर्द, ता- पारनेर)

यांच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत पाठविलेल्या पाच प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी अंतिम निर्णय घेऊन पाचही धोकादायक इसमांना मंगळवारपासून एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत. प्रभारी पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवन आज एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. स्थानबध्द करण्यात आलेल्या धोकादायक व्यक्ती विरुध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/