नगर : जिल्हा न्यायालयातच वकिलास मारहाण

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये आरोपीच्या वकिलास फिर्यादीने बेदम मारहाण केली. न्यायालय आवारात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मारहाण करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वकील पोलिस ठाण्यात गेले होते.

याबाबत माहिती अशी की, लवसिंग कर्तारसिंग चावला हे एका गुन्ह्यात फिर्यादी आहे. आरोपीचे वकील अख्तर शेख हे आज दुपारी न्यायालयात असताना कर्तारसिंग व वकीलांमध्ये वाद झाला. त्याने वकिलास न्यायालयातच मारहाण केली. वकील व फिर्यादीमधील वाद सोडविण्यासाठी इतरांनी गर्दी केली. त्यांच्यातील वाद सोडवला. त्यानंतर वकील तक्रार नोंदविण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गेले.

पोलिसांनी वकिलास वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/