Nagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार 

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nagar Pune Highway Accident | नगर- पुणे महामार्गावरील पळवे शिवारानजीक मंगळवारी दोन मालवाहू ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात (Nagar Pune Highway Accident) झाला. यामध्ये ट्रकमधील दोन तर दुचाकीवरील दोन अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.

राजाभाऊ चव्हाण (वय 50, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम चव्हाण (वय 18), शुभम राजू देशभ्रतार (वय 24, रा. चमेली, ता. काटोल, जि. नागपूर), राहुल मधुकर डोंगरे (वय 31, रा. सावली. ता. कारंजा, जि. वर्धा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्याहून नगरकडे मालट्रक (एमएच 40 वाय 3681) निघाला होता. या ट्रकने पळवे शिवारानजीक थांबलेल्या एका ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली महत्त्वाचे म्हणजे या दोन ट्रकच्यामध्ये दुचाकी (एमएच 21 बीएल 4655) सापडल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.

ट्रक चालकाने जोरात ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी अँगल चालकाच्या केबिनमध्ये घुसून त्यात चालक व क्लीनरचा मृत्यू झाला.
अपघात (Nagar Pune Highway Accident) इतका भीषण होता की,
घटनास्थळी बघ्यांची गर्दी इतकी झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन गोकावे (Senior Police Inspector Nitin Gokave) यांनी धाव घेऊन मदतकार्य केले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Nagar Pune Highway Accident | father and son with other two killed in road accident on ahmednagar pune highway in parner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण

MP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का? खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले – ‘…त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव’

Sinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर ! कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी; उड्डाणपुलाचे भुमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते (व्हिडीओ)