4000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बेलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे स्टॉल सुरू करण्यासाठी मासिक 4 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रेल्वे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी नगरच्या पथकाने ही कारवाई केली.

वैजनाथ पांडुरंग बडे (वय 37 वर्षे, पोलीस नाईक, ब.न. 1147, बेलापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र, श्रीरामपूर, मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत, औरंगाबाद रेल्वे पोलीस जिल्हा, रा.वार्ड नंबर 7, निर्मल क्लासेस समोर, श्रीरामपूर, अहमदनगर, वर्ग 3) हे अटक केलेल्या पोलीस कर्मचारीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचा बेलापूर रेल्वे स्टेशन येथे मिल्क स्टॉल आहे. सदर स्टाॅल चालू देणेकरीता मासिक हप्ता म्हणून कर्मचारी बडे याने लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 5 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 4 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान 4 हजार रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारली.

उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवार, दीपक करांडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit – policenama.com