अहमदनगर : 46 लाखांचा डांबर घोटाळा, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुणवत्ता चाचणीचे बनावट अहवाल दस्तऐवज करून सरकारची 46 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परीषदेच्या नोंदणीकृत ठेकेदाराविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डांबर घोटाळ्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने ठेकेदारांत खळबळ उडाली आहे.

जुनेद कलीम शेख (रा. श्रीरामपूर) हे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. अर्जुन यादव आंधळे (रा. वसंत टेकडी, नगर, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद) यांनी फिर्याद दिली होती. याबाबत माहिती अशी की, शेख हा जिल्हा परिषदेचा नोंदणीकृत्र ठेकेदार आहे. शेख याने 2005 ते 2017 याकालावधीत वेळोवेळी साहित्य गुणवत्ता चाचणीचे बनावट दस्ताऐवजाचा वापर करून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची 46 लाख एक हजार 249 रूपयांची फसवणूक केली आहे.

ठेकेदार शेख याने केलेल्या फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता अर्जुन आंधळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून जुनेद शेख याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंगाळे हे करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –