अहमदनगर : ग्रामपंचायतीत 57 लाखांचा गैरव्यवहार ; उपसरपंच, ग्रामसेवकाविरुद्ध FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंचाच्या बोगस सह्या करुन सुमारे ५७ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्हाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच गितांजली अविनाश आव्हाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सन २०१४ ते २०१९ या कालावधीत मजले चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंच होतो. या काळात उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्हाड यांनी खोट्या ग्रामसभा दाखवत बनावट ठराव तयार केले व त्यावर महिला सरपंचाची बनावट सही व शिक्के मारुन मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात तब्बल ५७ लाख १५ हजार ४१७ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.

याबाबत आपण सरपंच असतानाही आपणास तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनाही अंधारात ठेवण्यात आले. या बनवाबनवीत या दोघांनी जिल्हा परिषद प्रशासन व राज्य शासनाचीही फसवणूक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like