शिक्षा झालेल्या 17 फरारींचा शोध घ्या : औरंगाबाद खंडपीठाचा पोलिसांना आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर गुन्ह्यात उच्च न्यायालयात अपिल दाखल केल्यानंतर आरोपींना जामीन मिळाल्यानंतर काही आरोपी न्यायालयात पुन्हा हजर होत नाहीत. अपिलामध्ये शिक्षा कायम झाल्यानंतर आरोपी शिक्षा भोगण्याऐवजी फरारी झालेले आहेत, अशा आरोपींचा शोध घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.

सुनावणीत उच्च न्यायालय जिल्हा न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम करते, तर काही वेळेस आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष सुटका होते. परंतु, काही अपिलामध्ये शिक्षा झाल्यानंतर आरोपी मात्र शिक्षा भोगावी लागू नये म्हणून फरारी झालेले आहेत. अशा आरोपींचा शोध घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

उच्च न्यायालयातून शिक्षा झालेले नगर जिल्ह्यातील 17 आरोपी फरारी आहेत. त्यातील काही आरोपी तीस वर्षापूर्वीच्या जुन्या गुन्ह्यातील आहेत. या आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. खून, खुनाचे प्रयत्न, अत्याचार, दरोडे व इतर गंभीर गुन्ह्यांतील हे आरोपी आहेत. जिल्हा वस्त्रालया शिक्षा झालेल्या काही आरोपींना उच्च न्यायालयाकडून काही गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मंजूर होतो. मंजूर झाल्यानंतर उच्च न्यायालयात आरोपीचा वकील सुनावणीला हजर होतो. अनेक वर्षे ही सुनावणी चालते.

Visit : Policenama.com