अहमदनगर शहरात घरगुती सेक्स रॅकेट चालविणार्‍यांचा पर्दाफाश ; ५ जणांसह एक महिला ताब्यात, संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील तपोवन रोड भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्या घरावर छापा पाच पुरुष, एका महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे, तर एकीची सुटका करण्यात आली. आज सायंकाळी तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. महिलांना तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.

अर्जुन भुजबळ, संतोष भुजबळ, समीर शेख, कैलास क्षिरसागर, अक्षय दरंदले ही अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील तपोवन भागात वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, पोलीस कर्मचारी विश्वास गाजरे, तरटे, शाईन पठाण आदींच्या पथकाने तपोवन रोड भागातील श्रावणी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकला.

तेथे काही महिला व पुरुष आढळून आल्या. पोलिसांनी पाच पुरुष व एका महिला एजंटलाा ताब्यात घेतले आहे, तर एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या