नगरमध्ये राष्ट्रवादीला धक्‍का ! जि.प. चे माजी उपाध्यक्ष झावरे भाजपमध्ये प्रवेश करणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर तालुक्यातील राजकारण आता चांगलेच तापले असून पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याचे चिन्ह असून राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी या सवांद मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाह इतर पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीने आपल्यावर कसा अन्याय केला याचा पाढा वाचून दाखवला. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Sujit Jhavare

भाजपमध्ये जाण्याचा सल्ला ही कार्यकर्त्यांनी झावरे यांना दिला. मात्र ही सभा फक्त संवाद साधण्यासाठी असून राष्ट्रवादी पक्षाने पारनेर धून ज्या उमेदवाराला निवडणुकीला संधी देण्याचा जो खटाटोप चालवला आहे तो फक्त पैशाचा जोरावर असून जिल्हाध्यक्षांना मोठी थैली गेल्याने त्यांनी आपले नाव मागे टाकत गुंडाला उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. एमआयडीसी मध्ये हफ्तेखोरी चांदचोरी करणारे आणि रात्री अपरात्री लोकांच्या वाढदिवस साजरा करणाऱ्या आणि कोणतीही राजकीय उंची नसलेल्या माणसाला उमेदवारी देत असाल तर आम्ही अशा माणसाच्या मागे उभे राहणार नसून पारनेरच्या भवितव्यासाठी लवकरच राजकिय भूमिका जाहीर करू असे सुजित झावरे यांनी स्पष्ट केले.

Sujit Jhavare

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like